"पिल्लू"
'Pillu' means Puppy. I affectionately call my daughter a 'Pillu'
.
पिल्लू एक सांगू..
मुळात हा माझा वेढेपणाच आहे.
कारण कालचं तर तू अवघ्या तीन महिन्यांची झालीयेस..
पण असं वाटतयं. .
आपलं नात खूप जूनं..
अगदी भरभक्कम मजबूत अवाढव्य चिरेबंदी गडासारखं..
अगदी शंभर एक वर्षे सहज ओलांडली असतील... .. .. इतकं जूनं ..
या तीन महिन्यांत मी तरी शंभर एक वर्षे आयुष्य जास्त जगलोयं. .. ..
आज मी माझ्या व्यापात अडकून होतो..
तूला वेळ देताच आला नाही..
पण तु तरी हाक द्यायची ना..
'बाबा' म्हणून. .
बघ पिल्लू माझ्या वेडेपणाचा कहर बघं...
तुला आजून बोलता कुठ येतयं. .. .
तरीही तुझ्याशी बोलतोय..
अगदी कळत्या माणसांशी बोलतात ना तसाचं..
.
मी ही बोललो नाही आणि तुही नाही. ..
.
न काही सांगताच निघून गेलीस ना गावी. .
त्या घरट्यातल्या पिल्लाला पंख फुटावेत आणि भूरकनं उडून जावे....
मोकळ्या आभाळात..
आपला आपला मार्ग शोधण्यासाठी. .. .
.
मला ठाऊक आहे ही काळाची गरज आहे. .
पण काळ ही कधीकधी सोकावतो..
तो आजही सोकावलाय.... .. ... !
माझ्यावर.. ! घरावर. ... ! घरातल्या माणसांवर....!
आणि घरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवर..
न सांगताच त्या काळाने घाव केला. . आणि क्षणार्धात सगळं रिकाम सुनं सुन करून गेला..
तो पाळणा आ वासून पाहतोय माझ्याकडे. .
खेळतानाचे तुझ्या पैंजनाचे नाद छुम छुम त्याला ऐकायचेत ..
ते दुपटं, बाळूतं, टोपी, खुळखुळा .. तुझ्या अल्हाद दायक स्पर्शासाठी आसूसलयं. .
सदैव प्रेरणा देणारं माझं घर खिन्न झालयं.. त्यानेही माझ्याशी अबोला धरलायं...
तुझ्या शेजारी बसून बारकाईनं तुला रोज न्याहाळणारं..
ते मनीचं पिल्लू पायात घुटमळतयं
इकडून तिकडे अंगावर उड्या मारतयं..
माझी सखी सई कुठ आहे?? .. म्हणून ओरबाडून विचारतेय..
.
माणसांचं तर काही विचारू नको..
आईआजी, काकूआजी, पंजीआजी एकटक बघत राहतात पाळण्याकडे खिन्न नजरेने..
आणि काकाआजोबांनी तर ढसाढसा रडणं तर सहावतचं नाही ..
.
मला ठाऊक आहे. . तू मला हाक न देताच का गेलीस..
कारण या भाऊक बाबाला तुझ्या इतकं कोणीच नाही ओळखू शकतं. .
माझ्या काळजाचा ताबा न सुटावा..
अन् आसवांचा बांध न फुटावा..
यासाठीच ना. .
तसा मी खूप खंबीर आहे गं..
पण तू गावी गेलीस अन् मनात विचार आला..
तिनं महिन्याचं लेकरू काही दिवसांसाठी दूर झाल्यावर. .
जिव एवढा कासावीस होत असेल तर. ..
..
तर
..
तू काही वर्षांनी तुझ्या लग्नानंतर. ..!!!! !!!
डोळे लख्ख भरून आले..
गळ्याने आतल्या आत हंबरडा फोडला. ..
पापण्यांनी अपचुक मिटणे पसंत केले. .
सगळ सावरायच्या आत पाणी गालावरून घरंगळून गेले..
हा विचार सुद्धा असह्य होत होता..
खूप पुढचा विचार करून गेलो मी
आयुष्यचं हरून गेलो मी..
ये ना पिल्लू. .
लवकर ये..
या बापाच्या काटेरी गालावर तुझा कापसासारखा मऊ हात फिरवायला ये न पिल्लू. .
वयाने वाढलेल्या अंधारी मनाला प्रकाशाची ज्योत दाखवायला ये...
बघ पुन्हा कसा जोश येईलं..
या जगण्याला पुन्हा एकदा यश येईल. .
पडलेले खांदे सरळ होतीलं
दुःख सारी विरळ होतील..
तु फक्त ये. .
परतुनी ये..
पिल्लू ये..
.
खरं सांगू एक सांगता सांगता बरचं काही सांगून गेलो.. ...
थांबाव म्हटलं तरी नाही थांबवू शकलो शब्दांना. .
माझं हे नेहमी असचं होतं. ..
तू नसताना तुझ्याशीच बोलत राहतो,
भरकटत राहतो तुझ्या भोवती..
बडबडत राहतो एखाद्या वेड्यासारखं..
.
.... . मदि. भिलारे
दि. १८'०४'२०१७
#बोबडे_बोल
(बोबडे बोल या काव्यसंग्रहातून)

No comments:
Post a Comment