Thursday, February 28, 2019

नाम

 नाम.. 
"The Name" meaning Worthiness #the_Name


In the Name of Love Remixes


माझे मला आता नाम आहे
लाचार ती जिंदगी जाम आहे .. .

लावले दिवे कुठे कुठे आजवर
उजेडात पसरला पैगाम आहे ...

उचमळले रक्त कितीसे लालीतातले
शण्डांचे किती त्या आला दाम आहे ..

चला सोडून देऊया तेव्हाचे स्वधर्म
समधर्माची हरेक टोपी वाम आहे .. .

नैराश्य वेळोवेळी साठत गेले अंतरी
आशेची जिंदगी वेगळी पैगाम आहे ..

   ____मनोज भिलारे 

other resource

Qualification पात्रता, योग्यता, लायकी, मर्यादित करणे, मर्यादा घालणारी गोष्ट

Deserts लायकी, योग्यता

Fitness योग्यता, औचित्य, धडधाकटपणा

Standing  स्थायी, योग्यता, ठरुन गेलेला, कायमचा, न कापलेले अवधी

If I told you this was only gonna hurt


If I warned you that the fire's gonna burn

Would you walk in?
Would you let me do it first?
Do it all in the name of love
Would you let me lead you even when you're blind?
In the darkness, in the middle of the night
In the silence, when there's no one by your side
Would you call in the name of love?
In the name of love
Name of love
In the name of love
Name of love
In the name of...
In the name, name
In the name, name
If I told you we could bathe in all the lights
Would you rise up, come and meet me in the sky?
Would you trust me when you're jumping from the heights?
Would you fall in the name of love?
When there's madness, when there's poison in your head
When the sadness leaves you broken in your bed
I will hold you in the depths of your despair
And it's all in the name of love
In the name of love
Name of love
In the name of love
Name of love
In the name of...
In the name, name
In the name, name
I wanna testify
Scream in the holy light
You bring me back to life
And it's all in the name of love
I wanna testify
Scream in the holy light
You bring me back to life
And it's all in the name of love
In the name of love
Name of love
In the name of love
Name of love
In the name of...
In the name, name
In the name, name
In the name of...
In the name, name
In the name of...

Artists: Bebe Rexha, Martin Garrix

Album: In the Name of Love Remixes

Wikipedia A name is a term used for identification by an external observer. They can identify a class or category of things, or a single thing, either uniquely.

Thursday, April 20, 2017

"पिल्लू"


"पिल्लू"
'Pillu' means Puppy. I affectionately call my daughter a 'Pillu'




.
पिल्लू एक सांगू..
मुळात हा माझा वेढेपणाच आहे.
कारण कालचं तर तू अवघ्या तीन महिन्यांची झालीयेस..
पण असं वाटतयं. .
आपलं नात खूप जूनं..
अगदी भरभक्कम मजबूत अवाढव्य चिरेबंदी गडासारखं..
अगदी शंभर एक वर्षे सहज ओलांडली असतील... .. .. इतकं जूनं ..
या तीन महिन्यांत मी तरी शंभर एक वर्षे आयुष्य जास्त जगलोयं. .. ..
आज मी माझ्या व्यापात अडकून होतो..
तूला वेळ देताच आला नाही..
पण तु तरी हाक द्यायची ना..
'बाबा' म्हणून. .
बघ पिल्लू माझ्या वेडेपणाचा कहर बघं...
तुला आजून बोलता कुठ येतयं. .. .
तरीही तुझ्याशी बोलतोय..
 अगदी कळत्या माणसांशी बोलतात ना तसाचं..
.
मी ही बोललो नाही आणि तुही नाही. ..
.
न काही सांगताच निघून गेलीस ना गावी. .
त्या घरट्यातल्या पिल्लाला पंख फुटावेत आणि भूरकनं उडून जावे....
मोकळ्या आभाळात..
आपला आपला मार्ग शोधण्यासाठी. .. .
.
मला ठाऊक आहे ही काळाची गरज आहे. .
पण काळ ही कधीकधी सोकावतो..
तो आजही सोकावलाय.... .. ... !
माझ्यावर.. ! घरावर. ... !  घरातल्या माणसांवर....!
आणि घरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवर..
न सांगताच त्या काळाने घाव केला. . आणि क्षणार्धात सगळं रिकाम सुनं सुन करून गेला..
तो पाळणा आ वासून पाहतोय माझ्याकडे. .
खेळतानाचे तुझ्या पैंजनाचे नाद छुम छुम त्याला ऐकायचेत ..
ते दुपटं, बाळूतं, टोपी, खुळखुळा ..  तुझ्या अल्हाद दायक स्पर्शासाठी आसूसलयं. .
सदैव प्रेरणा देणारं माझं घर खिन्न झालयं.. त्यानेही माझ्याशी अबोला धरलायं...
तुझ्या शेजारी बसून बारकाईनं तुला रोज न्याहाळणारं..
ते मनीचं पिल्लू पायात घुटमळतयं
इकडून तिकडे अंगावर उड्या मारतयं..
माझी सखी सई कुठ आहे?? .. म्हणून ओरबाडून विचारतेय..
.
माणसांचं तर काही विचारू नको..
आईआजी, काकूआजी, पंजीआजी एकटक बघत राहतात पाळण्याकडे खिन्न नजरेने..
आणि काकाआजोबांनी तर ढसाढसा रडणं तर सहावतचं नाही ..
.
मला ठाऊक आहे. .  तू मला हाक न देताच का गेलीस..
कारण या भाऊक बाबाला तुझ्या इतकं कोणीच नाही ओळखू शकतं. .
माझ्या काळजाचा ताबा न सुटावा..
 अन् आसवांचा बांध न फुटावा..
यासाठीच ना. .
तसा मी खूप खंबीर आहे गं..
पण तू गावी गेलीस अन् मनात विचार आला..
तिनं महिन्याचं लेकरू काही दिवसांसाठी दूर झाल्यावर. .
जिव एवढा कासावीस होत असेल तर. ..
..
तर
..
तू काही वर्षांनी तुझ्या लग्नानंतर. ..!!!! !!!
डोळे लख्ख भरून आले..
गळ्याने आतल्या आत हंबरडा फोडला. ..
पापण्यांनी अपचुक मिटणे पसंत केले. .
सगळ सावरायच्या आत पाणी गालावरून घरंगळून गेले..
हा विचार सुद्धा असह्य होत होता..
खूप पुढचा विचार करून गेलो मी
आयुष्यचं हरून गेलो मी..
ये ना पिल्लू. .
लवकर ये..
या बापाच्या काटेरी गालावर तुझा कापसासारखा मऊ हात फिरवायला ये न पिल्लू. .
वयाने वाढलेल्या अंधारी मनाला प्रकाशाची ज्योत दाखवायला ये...
बघ पुन्हा कसा जोश येईलं..
या जगण्याला पुन्हा एकदा यश येईल. .
पडलेले खांदे सरळ होतीलं
दुःख सारी विरळ होतील..
तु फक्त ये. .
परतुनी ये..
पिल्लू ये..
.
खरं सांगू एक सांगता सांगता बरचं काही सांगून गेलो.. ...
थांबाव म्हटलं तरी नाही थांबवू शकलो शब्दांना. .
माझं हे नेहमी असचं होतं. ..
तू नसताना तुझ्याशीच बोलत राहतो,

भरकटत राहतो तुझ्या भोवती..
बडबडत राहतो एखाद्या वेड्यासारखं..
.
.... . मदि. भिलारे
दि. १८'०४'२०१७
#बोबडे_बोल
(बोबडे बोल या काव्यसंग्रहातून)

Tuesday, September 13, 2016

"देवळात....! "




"देवळात....! "
Devalat (Deul)  thats  mean houe of God..
  In the description of this poem Humans are beggar, He always beggig to god or Great person.



निघाली स्वारी, देवाजीच्या दारी
अडचणी आल्या, लय भारी॥धृ॥
.
हात जुळले आज पुन्हा
करोणी मोठा काही गुन्हा
मार्ग तो तसा फार जुना
वैतागवाडी हटवा सारी॥१॥
.
काही नाही कर्मावरी
सोपवले सारे तुझीयावरी
डोक ठेवतो पायावरी
उभा सदा भिकारी ॥२॥
.
थोडी कृपा दृष्टी मागतो
फुल नारळ ही सांगतो
आता सरळा वागतो
आडचणीत येतो सकाळपारी॥३॥
.
....मनोज भिलारे
दि. १७.०८.२०१५

Wednesday, August 10, 2016

झोपेतली रात्र


झोपेतली रात्र 
    
Don't go back to sleep.
The word is trembling in my night ..


night at Sleep






झोप खूप दिव्यातून गुजरते आहे..
'घोरणे' एकटे बिचारे गुरगूरते आहे.. .
.
काजव्यांना का लागे दिसाची घाई,
त्या उजेडात 'झोप' सुरकुतते आहे..
.
विचारांचा स्वातंत्र्यात थैमान झाला,
मिटल्या डोळ्यात रात चुरचुरते आहे.. .
.
कंगाल हळहळे उद्याच्या तमेत,
ही रात्र पावसाळी झिरझिरते आहे..
.
नको फिरकूस 'झोपे' तू आता,
शब्द माझे रात्रीत थिरथिरते आहे..
.
.. . मदि. भिलारे
दि. 10'08'2016


Other Resources 

Don't Go Back To Sleep

The breeze at dawn has secrets to tell you.

Don't go back to sleep.

 

You must ask for what you really want.

Don't go back to sleep.

 

People are going back and forth

across the doorsill

where the two worlds touch.

 

The door is round and open.

Don't go back to sleep.


----Rumi

Friday, August 5, 2016

"श्रीरंगा.. ."


"श्रीरंगा.. ." 
Sriranga is another name of Lord Krishna and he is also called Satyanarayana.
This is a poem about Satyanarayana's worship. During the month of Shravan, most Marathi people perform this pooja according to the Hindu calendar (September).


Shri Krushna, hare Rama hare Krishna



खूट उभे केले चार चौरंगाला,
सांग भटा ठेऊ कुठे श्रीरंगाला..
.
निर्मात्यालाच जागा द्यावी विश्वात,
कुंचल्यातून कसे सांगावे रंगाला... .
.
फिल्टरेशन करू किती पाण्याचे,
लाटेतूनी कसे गाळू तरंगाला..
.
रसायनांत विरला रानमेवा,
ना रंग आता कोणत्या नारंगाला.. .
.
धिंगाणा करून गेली तालवाद्ये,
रिमेकात कोठे ठेवू सारंगाला..
.
जन्म देशी अन् जाळशी जन्माला,
वैकुंठी या कोठे लावू सुरूंगाला..
.
.... मदि. भिलारे
दि. 05'08'2016


Other Resource

Wikipedia -  Sriranga III   (1642–1678/1681 CE)   was the  last ruler of the Vijayanagara Empire,  who came to power in 1642 following the death of his uncle Venkata III.